महालक्ष्मी मंदिरावर २ कोटी खर्चून कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्यास जिल्हा नियोजन मंडळाने मंजुरी दिल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील पर्यटन वाढायचे असेल तर पर्यटक कोल्हापुरात आला पाहिजे. त्यासाठी महालक्ष्मी मंदिर विकासासाठीचा ७२ कोटींचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. मंदिरावर कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्याची योजना असून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती १ कोटी, तर जिल्हा नियोजन मंडळातून १ कोटी खर्च केले जातील. पन्हाळ्याचा इतिहास मांडण्यासाठी तेथेही दृकश्राव्य पद्धतीने सादरीकरणाचा प्रकल्पही हाती घेण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
महालक्ष्मी मंदिरावर कायमस्वरूपी विद्युत रोषणाई
