ठाण्यात गणेश मंदिरातून मूर्तीची चोरी

ठाण्यात गणेश मंदिरातून मूर्तीची चोरी

ठाण्यातील ढोकाळी परिसरातील कोलशेत रोडवरील नंदीबाबा मंदिर येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी मंदिराच्या जाळीतून मंदिरातील दोन मूर्ती चोरून नेल्या. या प्रकरणी १९ वर्षीय तरुणाने तक्रार दाखल केली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास हा तरुण मंदिराची साफसफाई करून झोपी गेला. त्या वेळी चोरटय़ांनी पंचधातूची गणेशमूर्ती आणि पितळेची दुर्गा देवीची मूर्ती अशा सुमारे ६९ हजारांच्या दोन मूर्ती चोरटय़ांनी पळवल्या. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *