येथील कर्वेनगरमधील कंजुरमार्ग (पूर्व)मध्ये एम. एम. आर. डी. ए. च्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची एक भींत कोसूळून एक कामगार ठार झाला आहे. या घटनेत अन्य एक कामगार अजुनही ढिगाऱ्याखाली गाडला घेला असून त्याला बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
सकाळी ९.३० च्या सुमारास या इमारतीच्या स्लॅबच्या फळ्या काढण्याचे काम सुरू होते. यावेळी भींत कोसळून त्याखाली इंद्रजीत चव्हाण (२०), महेश कुमार दशरथ हे दोघे गाडले गेले. यातील इंद्रजीतला बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. महेश कुमार मात्र अजुनही ढिगाऱ्याखाली असून त्याला बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलाचे कर्मचारी करत आहेत.