करण जोहरच्या आगामी ‘स्टुडंट ऑफ द इयर’च्या सिक्वेलमध्ये झळकणारी सैफ अली खानची कन्या सारा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे. सारा खानचे एका मुलाबरोबरचे काही फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. मुंबई मिररच्या वृत्तानुसार सारा सोबत असलेला हा मुलगा वीर पहारिया आहे. या फोटोत ती वीरचे चुंबन घेताना दिसत आहे.
सारा आणि वीर दुबईत एकत्र शिकतात. वीर हा माजी केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. वीर आणि सारा हे एकमेकांच्या प्रेमात असल्याचा चर्चाही सध्या सुरु आहेत. त्यातच या दोघांच्या फोटोंमुळे मात्र या चर्चांसाठी चांगलेच खाद्य मिळाले आहे.