मला ओरिजनल राज ठाकरे व्हायला भाग पाडू नका

मला ओरिजनल राज ठाकरे व्हायला भाग पाडू नका

आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दुस-या पक्षाच्या वाटेवर असलेल्या मनसे नगरसेवकांना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी तंबी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादरमधील कृष्णकुंज निवासस्थानी बुधवारी मनसे नगरसेवकांची बैठक पार पडली.
यावेळी बोलताना राज यांनी दुस-या पक्षाच्या वाटेवर असलेल्या नगरसेवकांना मला ओरिजनल राज ठाकरे व्हायला भाग पाडू नका असा इशाराच दिला. तुम्ही पैशांसाठी दुस-या पक्षात जाणार असाल तर ते क्षणिक आहे, तुमच्या काही समस्या असतील तर मला सांगा असे राज यांनी सांगितले.
अलीकडे मनसेतील काही नगरसेवक फुटले व त्यांनी दुस-या पक्षांना साथ दिली. महापालिका निवडणुका जशा जवळ येतील तसे पक्षातील आऊटगोईंग आणखी वाढू शकते. राज ठाकरे यांना याची कल्पना असल्यामुळे त्यांनी नगरसेवकांना आधीच इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *