दिल्लीत जैश-ए-मोहम्मदच्या 12 संशयित दहशतवाद्यांना अटक

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जैश-ए-मोहम्मदच्या 12 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. दिल्लीच्या बाहेर तसंच उत्तर आणि पश्चिम दिल्लीत पोलिसांच्या विशेष पथकाने छापेमारी करत ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी 8 जणांना दिल्ली तर चौघांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.
महत्वाचं म्हणजे अटक करण्यात आलेल्या तरुणांकडून स्फोटकं बनवण्याचं साहित्यदेखील सापडलं आहे. या तरुणांची चौकशी सुरु असून यांचा कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे का ? याचा तपास सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
तरुणांकडे सापडलेल्या स्फोटकांमुळे शहरातील महत्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याची योजना आखली जात होती असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मंगळवारी रात्रीपासून पोलिसांनी हा छापेमारी सुरु केली होती. उत्तरप्रदेशात छापेमारी करण्यासाठी पाच तर दिल्लीत सात पथकं तयार करण्यात आली होती. सध्या दिल्ली पोलीस विशेष पथकाची 12 टीम राजधानीत वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांना उत्तरप्रदेशातील शहारनपूर आणि दिल्लीतील इंद्रपुरी परिसरातून उचलण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *