उत्तराखंडच्या जंगलातील आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत

उत्तराखंड राज्यातल्या नैनीतालमधल्या भीमताल आणि जवळपासच्या जंगलाला लागलेली आग विझवण्यासाठीच्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र खराब हवामानामुळे या प्रयत्नांना खीळ बसलीय.

जंगलांना लागलेल्या या आगीत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झालाय. तर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेलं क्षेत्र आता 2 हजार हेक्टरच्या घरात आहे.

हनुमानगढी इथून ही आग विझविण्याच्या अभियानाला सुरूवात झाली. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जवान ही आग विझवण्याचे प्रयत्न करतायेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *