मुंबईतील कामाठीपु-यात इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू

मुंबईतील कामाठीपु-यात इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू

ग्रांट रोड परिसरातील कामाठीपुरा येथे तीन मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. चारजण जखमी झाले असून त्यांना जेजे आणि नायर रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आलं आहे. चौदाव्या गल्लीत ही दुर्घटना घडली. दुरुस्तीचं काम सुरु असताना ही इमारत कोसळली असल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी आहेत. ढिगा-याखाली अजून काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. बचावकार्य अजूनही सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *