जामखेडपासून जवळपास ८ की मी अंतरावरील पोखरी जवळील पांढरी पोल फॅक्टरी येथे लक्झरी बस व टमटम यांच्यात भीषण अपघात पहाटे चार वाजता झाला. या अपघातात ६ जण जागीच ठार झालेत. तर दोघे जखमी झालेत. त्याच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बीड जिल्ह्य़ातील आष्टी तालुक्यातील पोखली येथे ही दुर्घटना घडली. या अपघातात तीन महिला दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. अॅपे रिक्षातून ८ जण प्रवास करीत होते. यातील प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

