देवनार आगप्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीप्रकरणी मुख्य आरोपी आतिक आणि रफिक यांना अटक करण्यात आलीय.

पुण्याच्या शिवाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली. आतापर्यंत याप्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आलीय.

पण आतिक आणि रफिक यांनीच मुंबईला प्रदुषणाच्या गर्तेत लोटणारं षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. या दोघांनाही २५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *