पी हळद

पी हळद

सुंदर दिसायचंय ना, मग लावा क्रीम, लोशन, पावडर असं एक समीकरण आताशा आपल्या डोक्यात जाहिरातींनी चांगलंच मुरवलं आहे. पण सौंदर्यासाठी बाह्योपचार पुरेसे नसतात. निव्वळ बाह्योपचारांनी मिळणारं सौंदर्य तात्पुरतं आणि वरवरचं असतं. त्वचेच्या पोषणासाठी आवश्यक असणारे घटक रोजच्या रोज पोटात गेले तर रूप निखरतं! खाण्यापिण्यातले रोजचे घटक डोळसपणो सेवन केले तर खरंखुरं आणि टिकून राहणार सौंदर्य आपल्याही वाटय़ाला नक्की येऊ शकेल!
खाण्या-पिण्यातून खरं सौंदर्य
 ‘पी हळद आणि हो गोरी’ असं उगाच नाही म्हटलं जात. जेवणात रोज हळदीचा वापर हा शरीरातली विषाक्तता घालवते आणि आरोग्य चांगलं राहतं. हळदीच्या सेवनानं त्वचेचं सौंदर्य खुलतं. म्हणूनच दुधात चिमूटभर हळद टाकून कपभर दूध रोज प्यावं.
 हिंग हा स्वयंपाकात रोज वापरलाच पाहिजे. हिंग करपट ढेकरामुळे श्वासाला येणारा दरुगध घालवते. हिंगाला स्वत:चाच वेगळा असा सुगंध आहे. हिंग हा जंतावर रामबाण उपाय आहे. हिंगाच्या सेवनानं त्वचा कुरतडणा:या जंतूंचा नाश होतो आणि त्वचा फाटत नाही, गुळगुळीत राहते.
 दाताच्या सौंदर्यासाठी खोबरं उपयुक्त ठरतं. थोडं खोबरं रोज चावून खावं. त्यामुळे दात चमकदार होतील. खोब:याचं चर्वण केल्यानं जबडय़ाचाही व्यायाम होतो.
 दुधापासून बनवलेले पदार्थ खावेत. यामुळे आत्मविश्वास वाढतो. शरीराला आवश्यक
ऊर्जा मिळते आणि त्वचाही मऊ व्हायला मदत
होते.
 विडय़ाचं पान रोज खावं. जेवणानंतर अवश्य पान खावं. पानामुळे पचनास मदत होते. कान आणि नाकातून गरम हवा बाहेर पडते त्यामुळे रंध्र मोकळी होतात. थोडय़ा वेळातच हलकं  वाटतं आणि जडपणा निघून जातो. पान सेवनामुळे सायनस मोकळं होतं. बाळंतिणीला कॅल्शियम मिळावं म्हणूनही विडा खायला देतात.
 जलपानाला सौंदर्योपचारात महत्त्वाचं स्थान आहे. आवश्यक तेवढं पाणी रोज प्यावं. योग्य प्रमाणात पाणी प्यालं तर सुकलेल्या झाडासारखी झालेली त्वचा टवटवीत होते आणि सौंदर्य खुलतं.
 नारळपाण्यात त्वचेचे पोषण करणारे घटक असतात. त्यामुळे आठवडय़ातून दोनदा तरी नारळपाणी प्यावं. यामुळे त्वचेला नैसर्गिक तजेला येतो. शरीरास आवश्यक माधुर्य मिळतं.
 रोजच्या आहारात हिरव्या भाज्यांचं सूप घ्यावं. अशा सूपमधून सर्व प्रकारचे लोहतत्त्व, खनिजं, पोषकतत्त्व शरीराला मिळतात, ज्यामुळे बाह्य सौंदर्य उजळतं.
  ताजं ताक जेवणात दररोज घ्यावं. ताक-भात थोडा तरी अवश्य आहारात घ्यावा. यामुळे तृष्णा शांत होते. ताकामुळे चेह:यावर चमक येते आणि ताजंतवानं वाटतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *