उन्हाळ्यात विशेषकरुन चेहऱ्याची काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात त्वचारोग तज्ञ नेहमी थंड पाण्याने चेहरा धुण्याचा सल्ला देतात. दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा थंड पाण्याने धुतल्यास त्वचेवरील ओलावा कायम राहतो.
मात्र तुम्हाला माहीत आहे का साध्या पाण्यापेक्षा नारळपाण्याने चेहरा धुतल्यास अधिक फायदे होतात. नारळ पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.
हे आहेत नारळपाण्याने चेहरा धुण्याचे ५ फायदे
१. तुमच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात डाग असतली तसेच सुरकुत्या असतील तर नारळ पाण्याने चेहरा धुणे फायदेशीर ठरते. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतात आणि त्वचेला नैसर्गिक चकाकी मिळते.
२. चेहऱ्यावर मुरुमे असल्यास नारळपाण्याने चेहरा धुवावा. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होते आणि मुरूमांची समस्या कमी होते.
३. डोळ्यांखाली काळी वर्तुळे असल्यास नारळपाणी उत्तम. नारळपाणी काही दिवस डोळ्यांखाली आलेल्या काळ्या वर्तुळावर लावल्यास काळी वर्तुळे कमी होतात.
४. त्वचेला उजाळा आणायचा असल्यास चेहरा धुण्यासाठी नारळपाण्याचा वापर अवश्य करा.
५. उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या अधिक होते. यावेळी नारळपाण्याने चेहरा धुतल्यास चेहरा उजळतो.