मध्यप्रदेशात सिंहस्थ कुंभमेळ्याला प्रारंभ

उज्जैनमधील सिंहस्थ कुंभमेळ्याला शुक्रवार पहाटेपासून उत्साहात प्रारंभ झाला. बारा वर्षानंतर होणा-या या कुंभमेळ्यासाठीचे आजचे पहिले शाही स्नान क्षिप्रा नदीत मोठ्या उत्साहात पार पडले. यासाठी देशभरातुन लाखो साधु-संत उज्जैनमध्ये आले आहेत.

या कुंभमेळ्यात पाच कोटी लोक सामिल होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यावर्षीचा कुंभमेळा ‘हरित सिंहस्थ’ म्हणून ओळखला जाईल, असे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले.

या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राज्य पोलीस दलाबरोबर केंद्रीय सुरक्षा दलाचा बंदोबस्त उज्जैनमध्ये ठेवण्यात आल्याचे पोलीस महानिरीक्षक मधु कुमार यांनी सांगितले.

रामघाट आणि दत्त अखाडा येथे सकाळी ६ वाजता साधु-संतांनी शाही स्नानाला सुरुवात केली. अन्य घाटांवर भक्तांच्या स्नानाची व्यवस्था केली आहे.

नागरिकांना वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलीस सज्ज ठेवले आहेत. मात्र पोलिसांनी अनेक ठिकाणी वाहने अडवल्याने भक्तांना आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *