पश्चिम जर्मनीमधील गुरुद्वा-यात करण्यात आलेल्या स्फोटप्रकरणी पोलिसांनी दोन हल्लेखोरांना अटक केली आहे. महत्वाचं म्हणजे हे दोन्ही हल्लेखोर अल्पवयीन आहेत. गुरुवारी झालेल्या स्फोटात 3 लोक जखमी झाले होते. अटक करण्यात आलेले आरोपी आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे.
हल्ल्यानंतर पोलिसांनी फुटेज जारी केलं होतं, ज्यामध्ये दोन व्यक्ती बॅग घेऊन जातात दिसत होत्या. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटक बॅगेत लपवली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. पोलिसांनी फुटेज जारी केल्यानंतर यातील एका आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. तर दुस-या आऱोपींला पोलिसांनी छापा टाकून अटक केली. दोन्ही अल्पवयीन हल्लेखोर जर्मनीचे नागरिक आहेत. जखमी झालेल्या तिघांपैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर होती. प्रकृतीत सुधारणा होत असून चिंतेची गरज नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.