जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्यातील लोलाब परिसरात दहशतवादी व सुरक्षा जवानांदरम्यान सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोलाब भागातील पुत्शाही परिसरात काही दहशतवादी लपल्याची खबर मिळताच सुरक्षा जवानांनी शोधमोहिम सुरू केली असता दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर देताना दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. मात्र या परिसरात अद्याप आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता व्यक्त होत असून चकमक जारी आहे.