ग्राहकांकडून प्रवासाचे अतिरिक्त शुल्क आकारल्यामुळे ओला व उबेर यांच्या अठरा टॅक्सी दिल्ली सरकारने जप्त केल्या आहेत. दिल्लीत सध्या सम-विषम नियमाची अंमलबजावणी सुरू असल्यामुळे या वाहतूक सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून जास्तीचे शुल्क आकारण्यात येत होते.
अतिरिक्त शुल्क आकारणीसंदर्भात ग्राहकांकडून वारंवार आलेल्या तक्रारींमुळे आम्ही या कंपन्यांच्या टॅक्सी जप्त केल्या आहेत. त्यापैकी बहुतांश टॅक्सी या उबेरच्या आहेत, अशी माहिती दिल्ली येथील सरकारी अधिकाऱ्याने दिली.