पश्चिम बंगालच्या ५६ ठिकाणी रविवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी झालेल्या हिंसेच्या घटना सोडल्या तर दुपारी तीन वाजेपर्यंत जवळजवळ ७० टक्के मतदान झाले.
निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते अनुब्रत मोंदल यांना बजावलेल्या नोटिशीच्या पार्श्वभूमीवर दुस-या टप्प्यातील मतदान होत आहे.
उत्तर बंगालमधील अलिपूरदूर, जलपायगुडी, दार्जिलिंग, उत्तर दिनाजपूर, दक्षिण दिनाजपूर, माल्दा या सहा जिल्ह्यात आणि दक्षिण बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात पहिल्या सहा तासात एकूण ५५.२८ टक्के मतदान झाले. ३८३ उमेदवारांचे भवितव्य साधारण १.२ कोटी मतदारांच्या हाती आहे. यामध्ये ३३ महिला उमेदवार आहेत.