सचिनवर कांबळीने केलेल्या टीकेवर ‘फॅन्स’ने घेतले तोंडसुख

सचिनवर कांबळीने केलेल्या टीकेवर ‘फॅन्स’ने घेतले तोंडसुख

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरवर टीका करून चर्चेत आला आहे.

३० एप्रिलनंतर आयपीएलच्या १३ सामने महाराष्ट्राबाहेर खेळविण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. या मुद्द्याला ट्विटरवर हवा देत कांबळीने आपला जवळचा मित्र सचिन तेंडुलकरवर टीकेची झोड उठवली होती.

काय म्हटला होता कांबळी

दुष्काळ आणि आयपीएलवर इतर कोणी नाही फक्त भारतरत्न एसआरटी (सचिन रमेश तेंडुलकर) उत्तर देऊ शकतो. असे लिहून कांबळी पुन्हा सचिनला वादात अडविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

सचिनच्या फॅन्सने घेतले कांबळीवर तोंडसुख

कांबळीच्या ट्विटनंतर सचिनचे फॅन संतापले आणि त्यांनी कांबळीची खबर घेतली.  ट्विटर युजर सौरभ महाजन म्हटला.  तुझ्या सारखा मित्र असेल तर शत्रूंची गरज नाही.

 bijli ka bill ‎@neend_aa_rahi_h या नावाने ट्विटर युजरने लिहिले की, सर सचिनचे नाव घेऊन तुम्ही तुमच्या करिअरमधील दुष्काळ दूर करण्याचा प्रयत्न करताहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *