आॅगस्टपासून नाशिक-मुंबई विमानसेवा

आॅगस्टपासून नाशिक-मुंबई विमानसेवा

सी प्लेनच्या माध्यमातून नाशिकहून पुणे विमानसेवा १५ जूनपासून सुरू होत असून, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नाशिक ते मुंबई विमानसेवाही सुरू होणार आहे. ओझर ते जुहूदरम्यान १५ आॅगस्टपासून ही सेवा सुरू होईल.

सी प्लेनच्या योजनेसंदर्भात उद्योजक आणि व्यावसायिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत मेहेरचे सहसंस्थापक सिद्धार्थ वर्मा यांनी ही माहिती दिली. नाशिक ते पुणे ही विमानसेवा केवळ सोमवार ते शुक्रवार अशीच असणार आहे. सी प्लेनच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मेहेर कंपनीने गंगापूर धरणाचा वापर करून नाशिक ते मुंबई सेवा देण्याची तयारी यापूर्वी केली होती. तथापि, त्याला विरोध झाल्याने कंपनीने जमिनीवरून टेक आॅफ करणारे तसेच उतरणारे तसेच पाण्यावरून झेपावू शकेल अशा विमानाच्या माध्यमातून नाशिक- पुणे सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. ओझर ते लोहगाव या विमानसेवेसाठी याच सी प्लेनचा वापर करण्यात येणार आहे. नाशिक-पुणे सेवेसाठी तूर्तास नऊ आसनी विमानाचा वापर केला जाणार आहे, असे वर्मा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *