‘द जंगल बूक’ची बॉक्स ऑफीसवर कोटींची कमाई

‘द जंगल बूक’ची बॉक्स ऑफीसवर कोटींची कमाई

बालपणीच्या आठवणी जाग्या करणारा मोगली आठ एप्रिलला सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आला असून दोन दिवसातच या चित्रपटाने कोटीची उड्डाणे घेतली आहेत.

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘द जंगल बूक’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर दमदार कमाईला सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवशी १०.०९ कोटींची तर दुसर-या दिवशी शनिवारी या चित्रपटाने तब्बल १३.५१ कोटी रुपये कमावले. दोन दिवसातच या चित्रपटाने २३.६० कोटींची कमाई केली.

अक्षयकुमारच्या एअरलिफ्टनंतर जंगल बुक हा २०१६ मधला सर्वात मोठे ओपनिंग मिळालेला दुस-या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे. ओपनिंग वीकेंडमध्ये हा चित्रपट ३८ ते ४० कोटींपर्यंत कमाई करेल, अशी आशा आहे.

द जंगल बूक या संपूर्ण चित्रपटात एकच मानवी पात्र आहे, ते म्हणजे मोगलीचे…  मोगलीची भूमिका साकारणारा लहानगा नील सेठीवर सर्व प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *