पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना ईबेवर काढलं विक्रीला

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना ईबेवर काढलं विक्रीला

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनाच विक्रीसाठी काढल्याची जाहिरात ईबे या वेबसाईटवर करण्यात आली आहे. नवाज शरीफ यांची किंमत ६२.३ लाख रुपये ऐवढी देण्यात आली आहे. शरीफ हे काहीही कामाचे नसलेले पाकिस्तानचे पंतप्रधान असल्याचं म्हटलं गेलं आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या कुटुंबाचं पनामा पेपर लीक प्रकरणात नाव आल्यानं ते चर्चेत आले आहे. टॅक्सची चोरी केल्याचा या प्रकरणात ठपका ठेवण्यात आलेला आहे. या प्रकरणात आईसलँडच्या पंतप्रधानांना राजनामा देखील द्यावा लागला आहे. हे कोणी केलं आहे याबाबत कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *