हैदराबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून अपघात झाला. या अपघातात कोणिही जखमी झालेले नाही. ही घटना हैदराबादमधील बेगमपेठ विमानतळाजवळ
रविवारी सकाळी घडली.
एअर इंडियाचे ए३२० हे विमान सेवेतून निवृत्त झाले आहे. त्यामुळे या विमानाचा उपयोग विमान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी केला जात होता.
एका क्रेनच्या मार्फत हे विमान बेगमपेठ विमानतळापासून २-३ किलोमीटर दूर असणाऱ्या प्रशिक्षण केंद्रात नेण्यात येत होते. शनिवारी रात्री हे विमान हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आणि रविवारी सकाळी हा अपघात झाला.
सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. विमानतळ परिसरात राहणा-या व्यक्तींच्या खाजगी मालमत्तेचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळते.