सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथील समुद्रात बोटीला आग लागली आहे. ही घटना आज सकाळी ९ वाजता घडली आहे. राजकोटच्या समुद्रात ही बोट मासेमारीसाठी चालली होती. बोटीला अचानक आग लागल्यामुळे खलाशासह मासेमार यांच्यामध्ये खळबळ उडाली. त्यानंतर मासेमारांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. बोटीला आग नेमकी कशामुळे लागली याचे अद्याप कारण समजू शकलेले नाही.
सिंधुदुर्ग : मालवण राजकोट येथे बोटीला आग
