एटीएममध्ये रोख रक्कम पुरविणाऱ्या गाड्यांवरील वाढते हल्ले पाहता यापुढे रात्री आठनंतर एटीएममध्ये पैसे भरले जाणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दिवसाच संबंधितांनी बॅंकांमधून पैसे घेऊन ते मशिनमध्ये भरण्याचे काम करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
ग्रामीण भागात सायंकाळी पाचपर्यंत तर नक्षली भागात दुपारी तीनच्या आतच पैसे एटीएम मशिनमध्ये भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सीसीटीव्ही आणि जीपीएस सारख्या अद्ययावत सुरक्षा व्यवस्था असलेल्या गाड्यांनीही पाच कोटींच्या वरील रक्कम नेऊ नये, असे सांगण्यात आले आहे. सध्या सुमारे आठ हजार खासगी गाड्यांमधून एटीएमसाठी दिवसाकाठी 15 हजार कोटींची ने-आण होते.
