पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी रश्मी शुक्ला

पुणे पोलीस आयुक्तपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला काम पाहत होत्या.

राज्याच्या गृह विभागाकडून गुरुवारी पुणे पोलीस आयुक्तपदी, रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्याचा आदेश  काढण्यात आला.

रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबई पोलीस दलात वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची पोलीस दलात विशेष ओळख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *