सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने भारतीय ग्राहकांसाठी अप्लीकेशन्स व डायल फेसेसच्या नवीन सेटसह स्टायलिश गिअर एस २ स्मार्टवॉचचे ३ नवीन व्हॅरिएंट्स दाखल केले.
विअरेबल विभागात सॅमसंगचे स्थान अबाधित राखत गिअर एस २ क्लासिकचे दोन आकर्षक एडिशन्स दाखल केले असून एक १८ कॅरट रोज गोल्ड व दुसरा प्लॅटिनममध्ये आहे.
गिअर एस २ व्हाईट हा तिसरा नवीन व्हॅरिएंट आहे. सॅमसंगने याबरोबरच ग्राहकांसाठी विविध अॅप्सची ऑफर दिली आहे.
जी नाईट स्लीप ट्रॅकिंग अप, मायनोट्स, झेनोझु यांचा समावेश आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे व्यवसाय संचालक मनु शर्मा म्हणाले की, गिअर एस २ हा स्लीक व स्मार्ट विअरेबल असून ग्राहकांना अप्रतिम अनुभव देईल.
