वारंवार गर्भपात होणाऱ्या महिलांच्या गर्भाशयात पेशींची कमतरता

ज्या गर्भवती महिलांचा वारंवार गर्भपात होतो, त्यांच्या गर्भाशयाच्या अस्तरात मूळ पेशींचे प्रमाण कमी असते असे दिसून आले आहे. या संशोधनामुळे नसíगक गर्भपाताच्या समस्येवर उपाय करणे शक्य होणार आहे. ब्रिटनमधील वॉर्विक विद्यापीठाच्या प्राध्यापन जॉन ब्रोसेन यांनी सांगितले की, गर्भाशयाच्या अस्तरात कमी मूळ पेशी असल्या तर ते गर्भपाताचे कारण ठरते. त्यामुळे हा दोष दूर करून नसíगक गर्भपात टाळणे शक्य आहे. स्टेम सेल्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. साधारण गर्भपाताचे प्रमाण हे १५ ते २५ टक्के आहे व शंभर महिलांमध्ये एकीच्या बाबतीत वारंवार गर्भपात होत राहतात किमान ते तीन ते चार वेळा लागोपाठ गर्भपात होऊ शकतो. १८३ गर्भवती महिलांच्या गर्भाशय अस्तराचे नमुने तपासले असता त्यात मूळ पेशी कमी असल्याचे दिसून आले. गर्भधारणेसाठी विशिष्ट प्रकारच्या मूळ पेशी काम करीत असतात व त्या वारंवार गर्भपात होणाऱ्या महिलांच्या गर्भाशयात नसल्याचे दिसून आले आहे. काही नमुन्यात अगदी नगण्य प्रमाणात मूळ पेशी दिसून आल्या. ज्या महिलांचे गर्भपात होत नाहीत त्यांच्यात विशिष्ट मूळ पेशींची गर्भाशयातील संख्या जास्त असते. मूळ पेशी नसतील तर गर्भाशयात निर्माण होणाऱ्या पेशी लवकर विकास पावतात व मरतात त्यामुळे गर्भपात होतो असे अभ्यासात दिसून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *