बँका चार दिवस बंद

या आठवड्यात गुरुवारपासून सलग चार दिवस सुट्टी आल्याने बँकांचे व्यवहार ठप्प राहणार आहेत. त्यामुळे खातेदारांना मंगळवार व बुधवारी बँकेचे सर्व व्यवहार करावे लागतील. या सुट्टीच्या काळात एटीएम मशिन्स चालू राहतील, याची काळजी घेतली जात आहे, असे बॅँकेच्या अधिका-यांनी सांगितले.

रंगपंचमीला लागून गुड फ्रायडे, चौथा शनिवार व रविवार असे चार दिवस सलग येत आहेत. त्यामुळे खातेदारांची मोठी अडचण होणार आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी एटीएम मशिन्स चालू राहतील, याची काळजी घेतली जाईल.

दरम्यान, आयडीबीआय बँकेच्या कर्मचा-यांनी २८ ते ३१ मार्च दरम्यान संप करण्याची नोटीस दिली आहे. मात्र, ग्राहकांची सोय टाळण्यासाठी बॅँकेने २६ मार्च रोजी पूर्ण दिवस काम करण्याचे ठरवले आहे. दरम्यान, आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाच्या विरोधात अखिल भारतीय एम्प्लॉईज असोसिएशन, ऑल इंडिया बॅँक ऑफिसर असोसिएशन यांनी संपाची हाक दिली आहे.

आयडीबीआय बॅँकेत सरकारचे ८० टक्के भांडवल असून ते ५० टक्क्यांपेक्षा कमी करण्याची घोषणा सरकारने अर्थसंकल्पात केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *