श्रीहरी अणे यांचा राजीनामा

विदर्भासह मराठवाडाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद ओढवून घेणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी राजीनामा दिला आहे. राजभवनात जाऊन राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास राजीनामा सुपूर्त केला आहे.

स्वतंत्र मराठवाडाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेना नेते राजीनाम्याने समाधानी नसून त्यांनी अणेंचा केवळ राजीनामा घेऊन भागणार नाही, तर त्यांनी केलेल्या विधानासंदर्भात त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *