अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीतासाठी नाही घेतले 4 कोटी रुपये

अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीतासाठी नाही घेतले 4 कोटी रुपये

पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्याआधी गायलेल्या राष्ट्रगीतासाठी एक पैसाही घेतला नसल्याचे खरमरीत स्पष्टीकरण महानायक अमिताभ बच्चन यांनी दिले आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या भारत-पाक सामन्याआधी अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजात राष्ट्रगीत पार पडले. पण त्यासाठी अमिताभ यांनी 4 कोटी रुपये घेतल्याचा दावा सोशल मीडियावर सुरू होता. पण हे वृत्त पूर्णपणे निराधार असून, राष्ट्रगीत गाण्यासाठी पैसे घेणारा माणूस हा गरीब मनाचा असतो, असंही अमिताभ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *