अनुष्का शर्मा सलमान खानला लोळवणार

अनुष्का शर्मा सलमान खानला लोळवणार

सलमान खानच्या आगामी सुल्तान सिनेमाचं शुटींग जवळपास आता अंतिम टप्प्यात आहे. या सिनेमामध्ये सलमान खानसोबत अनुष्का शर्मा झळकणार आहे.

अनुष्का शर्माने काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ती कुस्ती खेळतांना दिसत आहे. या सिनेमामध्ये अनुष्काचा रोल महत्त्वाचा असल्याच्या चर्चा आहे.

सुल्तानमध्ये अनुष्का शर्मा ही एका पहेलवानची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे अनुष्काने त्यासाठी पूर्ण ट्रेनिंग घेतलं आहे.

सुल्तानमध्ये सलमान आणि अनुष्का यांच्यात देखील फाईट दाखवण्यात आली आहे. सलमान खान देखील या सीनसाठी ट्रेनिंग घेतोय. त्यामुळे यांच्यातली फाईट बघणं हे प्रमुख आकर्षणाचं केंद्र राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *