पळ काढताना मल्ल्याच्या बाजूला ‘ती’ कोण?

पळ काढताना मल्ल्याच्या बाजूला ‘ती’ कोण?

किंगफिशरचा मालक आणि उद्योगपती म्हणून ज्यांनी डोक्यावर घेतलं असा, विजय माल्ल्या २ मार्च रोजी देश सोडून पळाला. माल्ल्यावर १७ बँकांचं ९ हजार कोटी रूपये कर्ज होतं.

मात्र माल्ल्या देश सोडून जाणारा एकटा नाहीय, एका इंग्रजी टीव्ही चॅनेलने दिलेल्या बातमीनुसार मल्ल्याच्या बाजूला एक महिला बसली होती.

तिचं नाव पिंकी ललवानी आहे. असं म्हटलं जातं की पिंकी माल्ल्या ही विजय माल्ल्या यांच्या खास लोकांमध्ये सामिल आहे, की जे माल्ल्याच्या गूड टाईममध्येही सोबत होते.

पिंकी ललवानी विजय माल्ल्यासोबत अनेक वर्षांपासून सोबत आहे. अफवा तर इथपर्यंत आहे की, विजय माल्ल्या आणि पिंकी ललवाणी यांनी लग्न केलंय, मात्र या माहितीवर अधिकृत स्पष्टीकरण मिळालेलं नाही, म्हणून ही माहिती अफवाच ठरलीय.

पिंकी ललवानी या आधी किंगफिशरची कर्मचारी होती, पिंकी ललवानी २०११ पासून विजय मल्ल्यासोबत दिसते असं सांगण्यात येतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *