नायजेरियामध्ये मशिदीत आत्मघातकी हल्ला, २२ ठार

नायजेरियामध्ये मशिदीत आत्मघातकी हल्ला, २२ ठार

नायजेरियातील मैदुगुरी शहरात एका मशिदीमध्ये दोन महिलांनी आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणला असून या स्फोटामध्ये २२ जणांचा मृत्यू झाला आहे. ही बॉम्बस्फोट बुधवारी दुपारच्या सुमारास घडवून आणला.

मशिदीमध्ये एका महिलेने आत्मघाती स्फोट घडवून आणला त्यानंतर मशिदी बाहेर दुस-या महिलेने आत्मघातकी स्फोट घडवला. या स्फोटात २२ जणांचा मृत्यू झाला तर काहीजण गंभार जखमी आहेत.

जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी बचाव कार्याचे पथक दाखल झाले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *