राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटूची गोळ्या घालून हत्या

राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू सुखविंदर सिंहची दोन अज्ञात इसमांनी गोळ्या घालून हत्या केली.

हरियाणा राज्यामधील रोहतक येथे मंगळवारी संध्याकाळी सुखविंदर सराव करून घरी परतत असतांना ही घटना घडली. घराजवळ लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमे-यामध्ये ही दृश्य कैद झाली आहेत.

मंगळवारी संध्याकाळी सुखविंदर सराव करून घरी परतत असताना तो फोनवर बोलत आपल्या घराजवळ पोहोचला. त्याचवेळी तेथे दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरुन आल्या आणि त्यांनी सुखविंदरला डोक्यात गोळ्या घातल्या. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दोघांचा शोध सुरू आहे. सुखविंदरचे कोणाबरोबरही वाद नसल्याचे त्याच्या आई वडिलांनी पोलिसांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *