बांगलादेश, ओमानचे पारडे जड

टी-२० वर्ल्डकप पात्रता फेरीतील ‘अ’ गटात शुक्रवारी (११ मार्च) होणा-या लढतींमध्ये आर्यलडविरुद्ध बांगलादेश तसेच हॉलंडविरुद्ध ओमानचे पारडे जड आहे.

सलामीला बांगलादेशला हॉलंडने झुंजवले. अन्य लढतीत ‘अंडरडॉग्ज’ ओमानने आर्यलडवर खळबळजनक विजयाची नोंद केली. विजयी सुरुवातीमुळे बांगलादेश आणि ओमानचा आत्मविश्वास उंचावला आहे. आणखी एक विजय मिळवून ‘सुपर टेन’साठी दावेदारी सिद्ध करण्याचा प्रयत्न उभय संघ करतील. अपयशी सलामीनंतर पात्रता फेरीतील आव्हान राखण्यासाठी आर्यलड आणि हॉलंडला विजय आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

आजचे सामने ओमान वि. हॉलंड (दु. ३ वा.)
बांगलादेश वि. आर्यलड (सायं. ७.३०वा.)

तस्कीन, सनीची गोलंदाजीची शैली आक्षेपार्ह

धरमशाला – बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद आणि डावखुरा फिरकीपटू अराफत सनीची गोलंदाजीची शैली आक्षेपार्ह असल्याचे निदर्शनास आले आहे. हॉलंडविरुद्धच्या लढतीनंतर मैदानावरील अंपायर्सनी तसे निरीक्षण नोंदवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *