ऊर्मिला, प्रीतीनंतर आता सुष्मिताचा नंबर?

ऊर्मिला, प्रीतीनंतर आता सुष्मिताचा नंबर?

बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटीजचा आता ब्रेकअप्सचा सिझन संपून लग्नाचा सिझन सुरु झाल्याचं म्हणावं लागेल. एकाच आठवडय़ामध्ये अभिनेत्री प्रीती झिंटा आणि ऊर्मिला मातोंडकर विवाह बंधनात अडकल्या.

ऊर्मिला आणि प्रीतीनंतर आता सुष्मिता सेनही लग्न करु शकते, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. सुष्मिता आणि रितिक भासिनचे काही फोटोंबाबत सध्या बोललं जात आहे. गेल्या 2 वर्षापासून सुष्मिता आणि रितीक एकमेकांना ओळखत आहेत. पण या दोघांमध्ये भांडण झाल्याच चर्चाही मध्ये झाल्या होत्या, पण आता पुन्हा या दोघांचे एकत्र फोटो काढण्यात आले आहेत. त्यामुळे आता बॉलिवूडच्या तिसर्‍या अभिनेत्रीचं आता लग्न होणार का? हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *