सोनाक्षी सिन्हाची ‘गिनीज बुक’मध्ये नोंद

सोनाक्षी सिन्हाची ‘गिनीज बुक’मध्ये नोंद

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाच्या नावाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. सोनाक्षीने नोंदवलेल्या एका आगळ्यावेगळ्या विक्रमामुळे तिची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आलीयं एकाच वेळी सर्वाधिक महिलांच्या नखांना नेलपेन्ट लावण्याचा अनोखा विक्रम सोनाक्षीने इतर काही महिलांच्या मदतीने केला आहे. महिला दिनाच्या औचित्यावर मुंबईमध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात भारतीय महिलांनी सर्वाधिक संख्येने नेलपॉलिश लावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. या महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा होती. या महिलांनी एकाच वेळी १३२८ महिलांच्या नखांना नेलपेन्ट लावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. तसेच त्यांना गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या महिलांचे नाव नोंदविण्यात आले. या महिलांनी तैवान नेल असोसिएशनचा ११५६ महिलांच्या नखांना नेलपेन्ट लावण्याचा रेकॉर्ड मोडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *