नंदूरबार येथील अपघातात ४ ठार, ६ जखमी

येथे भरधाव बोलेरो कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत.

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर शिर्वे फाट्यावर हा अपघात झाला. भरधाव बोलेरो कार आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.

जखमींना तातडीने तळोदा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *