देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह

राज्यासह देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह पाहण्यास आहे. मुंबईतील बाबुलनाथ मंदिरातही भाविकांनी शिवलिंग दर्शनासाठी गर्दी केली आहे. बाबुलनाथ मंदिर २०० वर्ष जुनं आहे.

महाशिवरात्री निमित्ताने अंबरनाथ शहरात मोठी यात्रा भरते. मध्यरात्री शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आलं. यावेळी लाखो भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.
अंबरनाथ शहरातील अतिप्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्तानं भाविकांनी मोठी गर्दी होते.

शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मध्यरात्रीपासूनच लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. हे शिवमंदिर हेमाडपंथीय असून शिलाहार राजा मुम्बानी याने ९५६ वर्षांपूर्वी बांधलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *