INS विराटला लागलेल्या आगीत एका इंजिनिअरचा मृत्यू

भारतीय नौदलाच्या आयएनएस विराटला लागलेल्या आगीत एका इंजिनिअरचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी ही घटना घडली आहे.
आयएनस विराट सध्या गोव्याच्या समुद्रकिना-यात तैनात आहे. दुपारच्या सुमारास बॉयलर रुममधून वाफेची गळती झाल्यामुळे ही आग लागली. आगीवर तात्काळ नियंत्रण आणण्यात आलं मात्र धुरामुळे उपस्थित 4 खलाशांचा श्वास गुदमरला असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे.
जखमी खलाशांपैकी चीफ इंजिनिअरिंग मेकॅनिक आशु सिंग यांना गोव्यातील नौदलाच्या रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. इतर 3 खलाशांवर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे. आयएनस विराट यावर्षी सेवेतून निवृत्त होतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *