डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात भीषण आग लागली आहे. मानपाडा रोडवरील शनि मंदिराजवळ असलेल्या अल्ट्रा प्युअर फेम कंपनीत शनिवारी सकाळी ही लागली. तसेच कंनीजवळच गॅस सिलेंडरचे गोदाम असल्याने आग आणखीन भडकली.
ही आग एवढी भीषण आहे की ब-याच अंतरावरूनही आगीच्या ज्वाळा व धूराचे लोट दिसत आहेत. अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.