पश्चिम बंगालमध्ये वीरभूम जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळी झालेल्या गावठी बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू झाला असून, दोघे जण जखमी आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरभूम जिल्ह्यात एका तृणमूल काँग्रेस नेत्याच्या घरात गावठी बॉम्ब तयार करण्यात येत होते. त्याठिकाणी हा स्फोट झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस तपास करत आहेत.