नेपाळमध्ये विमान अपघातात दोन ठार

नेपाळमध्ये एका विमानाला अपघात झाला असून या अपघातात दोनजण ठार झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी दुपारच्या सुमारास झाला.

पश्चिम नेपाळमध्ये या छोट्या विमानाला अपघात झाला. यामध्ये ११ प्रवासी प्रवास करत होते. या विमानाने उड्डाण केल्यानंतर ते पर्वतभागामध्ये पोहोचताच विमानाचा संपर्क तुटला. आणि तेथे विमानाला अपघात झाल्याची माहिती अधिका-याने दिली.

या अपघातात विमानाचे कॅप्टन दिनेश न्यूपाने आणि पायलट संतोष राणा यांचा मृत्यू झाला तर नऊ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळते.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोचण्यासाठी हेलिकॉप्टरमधून पोलीस व बचाव दलाचे जवान दाखल झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्यापही समजलेले नाही.

याआधी, नेपाळमधील तारा एअर कंपनीचे विमान बुधवारी नेपाळमध्ये कोसळले होते. या अपघातात २३ जणांचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *