उद्योगपती भंवरलाल जैन यांचे दु:खद निधन

उद्योगपती भंवरलाल जैन यांचे दु:खद निधन

जैन उद्योग समूहाचे संस्थापक-अध्यक्ष व ठिबकसिंचनाचे प्रणेते भंवरलाल जैन (७८) यांचे गुरुवारी मुंबई येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात अशोक, अनिल, अजित, अतुल ही चार मुले. सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

जैन उद्योग समूहाच्या माध्यमातून कमी पाण्यात जास्त सिंचन करणारी ठिबकची प्रणाली त्यांनी विकसित केली. कृषी उद्योग क्षेत्रात त्यांनी विविध प्रयोग केले. १४ फेब्रुवारी रोजी त्यांना विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले. जसलोक रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

शुक्रवारी त्यांचे पार्थिवजैन हिल्स येथील आकाश मैदानात अंत्यदर्शनासाठी सकाळी ८.०० ते रात्री ८.०० या कालावधीत ठेवण्यात येईल. शनिवारी सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत दर्शन घेता येईल. दुपारी ३.०० वाजता जैन धर्मातील प्रथेप्रमाणे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *