साहित्य : 2 वाटय़ा तांदूळ, प्रत्येकी 1 चमचा राजमा, काबुली चणे, चवळी, मूग, मसूर रात्री भिजवा व फार मऊ शिजणार नाहीत अशी कडधान्ये शिजवा. 2 लांब कांदे चिरलेले, आलं- लसूण पेस्ट, 1 इंच दालचिनी, 4 लवंगा, 4 मिरे.
कृती: थोड्या तेलावर कांदे तळून काढून घ्या. त्यात धुतलेले तांदूळ घालून परता. कडधान्य व मसाला, आलं, लसूण, मीठ, साखर, लिंबाचा रस घाला व खिचडी शिजवा. वर खोबरं, कोथिंबीर पेरा.