सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

बॉलीवूड अभिनेता सलमान खानला एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे वृत्त समोर आले आहे. पोलीस नियंत्रण कक्षात १६ फेब्रुवारीला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. फोन करणा-या व्यक्तीने तेव्हा सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली असून याबाबत पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, अज्ञात व्यक्तीकडून आलेला हा फोन एक बनावट कॉल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ज्या ठिकाणाहून हा फोन आला होता त्या ठिकाणाचा पत्ता पोलिसांना लागला आहे.  मात्र, पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला असला तरी सदर घटनेबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. सध्या सलमान त्याच्या आगामी ‘सुलतान’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *