सुफी गायक हंसराज हंस यांचा कॉँग्रेसमध्ये प्रवेश

सुफी गायक आणि शिरोमणी अकाली दलाचे माजी उपाध्यक्ष हंसराज हंस यांनी शनिवारी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पंजाब कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या उपस्थितीत हंसराज हंस यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंजाबमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पंजाबमधील दाओबा भागात वाल्मिकी समाजाचे वर्चस्व असून वाल्मिकी समाजाचे नेते म्हणून हंसराज ओळखले जातात.

हंसराज हंस यांनी ७ वर्षे शिरोमणी अकाली दलासोबत काम केले. २०१४ मध्ये ते शिरोमणी अकाली दलातून बाहेर पडले. जालंदर लोकसभा मतदार संघातून त्यांना शिरोमणी अकाली दलाने तिकीट नाकारले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *