भरधाव गाडी चालवत २००२मध्ये एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सलमान खानला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली. महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली.
हिट अँड रन प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाने सलमान विरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे सांगत त्याची सुटका केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने सलमानला नोटीस बजावली.
सलमानच्या लँड क्रूझर गाडीने ८ सप्टेंबर २००२ रोजी ब्रांद्रा फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले होते. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता, तर चारजण जखमी झाले होते.