जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘फ्रिडम २५१’ची खरेदी करणारे ग्राहक नाराज झाले आहेत. कंपनीने या स्मार्टफोनची विक्री थांबविली असून एक संदेश दिला आहे.
या स्मार्टफोनची बुकींग करतांना बाय (buy)वर क्लिक केले असता एक नवीन पेज सुरू होते. त्यात कंपनीने एक संदेश दिला आहे.
‘मित्रांनो तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप आभारी आहोत. सहा सेकंदाला सहा लाख हिट्स मिळत आहेत. तुमच्या जबरदस्त प्रतिसादामुळे सर्व्हर ओवरलोड झाला आहे. त्यामुळे बुकिंग सध्या थांबवण्यात आली. २४ तासांच्या आत पुन्हा भेटू, असे कंपनीने या मॅसेजमध्ये म्हटले आहे.
‘फ्रिडम २५१’ची बुकींग गुरूवार सकाळी सहा वाजल्यापासून सुरू झाली. मात्र, संकेतस्थळ काही वेळातच क्रॅश झाले. त्यानंतर पेमेंट करण्यात अडथळे येत होते. आणि आता कंपनीने बुकींग थांबवले आहे.