खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना हरियाणामध्ये घडली. ही पिडीत महिला दिल्ली पोलीस उपनिरिक्षकाची पत्नी आहे.
हरियाणाच्या झुज्जार जिल्ह्यातील बहादूरगड येथील एका खासगी रुग्णालयातील या महिलेला उपचारासाठी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
आरोपी रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. पिडीत महिलेने दिलेल्या साक्षीनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पिडीत महिलेच्या कुटुंबियांनी रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला.